Tuesday, October 11, 2022

सुरुवात आहे

~ सुरुवात आहे..

काळजाच्या आत आहे
केवढा आघात आहे

ठाव ना माझे मलाही
मी किती वादात आहे

दुःख बाबा शल्य आई
वेदना अभिजात आहे

मानले निर्दोष सगळे
मग कुणाचा हात आहे

ध्येय आहे लांब अजुनी
फक्त ही सुरुवात आहे

🫶🏻 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !