Monday, September 12, 2022

घ्यावे सामावून

~~ घ्यावे सामावून

आलीय समीप । वेळ निरोपाची
उसण्या श्वासांची । रिपरिप

लागेना कशाचा । ताळमेळ आता
ठेच येता-जाता । नियतीची

दिसेना कुठेच । आशेचा किरण
शेवटचा कण । आहे हाती

नाही शक्य झाली । स्वप्नांची पूर्तता
बळेच हसता । वाटे सोंग

चुकलेच म्हणा । आपलेही खूप
थोडे सुखरूप । राहताना

कीर्ती तरी मागे । कशी उरणार
जो-तो मोजणार । कर्म सारे

घ्यावे सामावून । देवा उदरात
सोडू नका हात । इहलोकी

■ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !