~~ दान पडावे ~~
काय करावे किती करावे
दुःखासोबत कसे जगावे
घालमेल जर होत राहिली
एकाजागी शांत बसावे
चंद्र, चांदण्या नकोत मजला
मंद दिव्याने घर उजळावे
घासामधला घास देऊन
जमेल तितके कामी यावे
हिंदू-मुस्लिम फूट कशाला
सगळे आता अखंड व्हावे
चुका भोवल्या मलाच माझ्या
ठेऊ मग मी कुणास नावे?
एकदातरी मनाप्रमाणे
झोळीमध्ये दान पडावे
🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !