Wednesday, March 9, 2022

खूप साधे तरी

▪️खूप साधे तरी..

प्रश्न होते तसे खूप साधे तरी
का बरे टाळली उत्तरे तू खरी

शक्यतांना तुझ्या वाव होता कुठे
मीच ओलांडली शेवटी पायरी

का उगा एवढा लोभ आहे तुला
काय नेणार तू ईश्वराच्या घरी

मांडल्याने कधी संपते का व्यथा
राहते नेहमी वेदना अंतरी

एक पाऊल तू फक्त आला पुढे
आणि नात्यातली संपली बघ दरी

घेतली धावती भेट गेल्या पुढे..
पाहुण्यासारख्या वागल्या या सरी

काय सांगू "किरण" कोण होतास तू
मुक्तछंदात तू तूच अल्पाक्षरी

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !