Wednesday, March 30, 2022

उभारू गुढी

🚩 उभारू गुढी..

चल उभारू गुढी एकतेची सदा
जात धर्मातली टाळण्या आपदा

कर्म कर चांगले ठेव हेतू भला
पाहिजे सौख्य जर जीवनी सर्वदा

मोकळे यायचे मोकळे जायचे
का हवी मग तुला एवढी संपदा

सोड "माझे-तुझे" भेद आतातरी
भांडणाचा नसे एकही फायदा

"दीप" होऊन तू तेज साऱ्यास दे
जन्म मनुजा असा लाभतो एकदा

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !