Wednesday, March 2, 2022

एका घरात आली

गीत - "एका तळ्यात होती"

गीतकार - ग. दि. माडगूळकर

▪️एका घरात आली.. (विडंबन)

एका घरात आली, मुलगी अती सुरेख
जमले तिला बघाया, मजनू क्षणात कैक ।।धृ।।

कोणी दिली चमेली, कोणी गुलाब, चाफा
कळले तरी कुणा ना, आल्या कुठून वाफा

पाहून खेळ सारा, दमले हसून लोक ।।१।।

मजनूस दुःख झाले, मग कोंडले स्वतःला
सर्वांस ही विनंती, सांगू नका कुणाला

जो तो बघून लपतो, बसला उरात धाक ।।२।।

एकेदिनी कळाले, आली नवीन कोणी
डोळे निळे तिचे अन्, दिसते दुधाळ लोणी

जवळून पाहताना बसली हळूच एक
नजरेसमोर अमुच्या झाला पुन्हा रिटेक ।।३।।

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !