Saturday, March 21, 2020

चमकणे काजव्यांचे

-- चमकणे काजव्यांचे --

झाली जवळीक पण
जुळलीच नाही मने
त्रास होता वेदनांचा
पाणावली ही लोचने

कुणी करावे आरोप
कुणी द्यावीत उत्तरे
ज्याचे त्यालाच ठाऊक
काय खोटे काय खरे

संभ्रमित मनाने या
कौल दिला नाही कधी
काय करायचे मग
हाती असून अवधी

पडतील कधी माझ्या
दारी सडे चांदण्यांचे
नमतील त्यानिमित्त
देठ साऱ्या ताटव्यांचे

आले स्वरूप आयुष्या
आल्या गेल्या पाहुण्यांचे
रात्री पुरतेच जसे
चमकणे काजव्यांचे

🌿 सागरराजे निंबाळकर

1 comment:

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !