Monday, May 19, 2025

रडतो आहे, हसतो आहे

रडतो आहे, हसतो आहे
दुःखासोबत जगतो आहे

स्वप्ने जो-तो, मोठी हल्ली
दिवसाढवळ्या बघतो आहे

झाले आहे का काही? तू..
चिंतेमध्ये दिसतो आहे

आठवणींचे क्षण सोनेरी
हृदयामध्ये जपतो आहे

कोणीही नसते कोणाचे
कोणावर मग रुसतो आहे

जीवन म्हणजे शर्यत असते
पडतो आहे, उठतो आहे

~ सागरराजे निंबाळकर 

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !