प्रत्यक्ष मात्र अगदी काट्यांसमान आहे
म्हटले जरी जगाने साहेब फार मोठा
आई तुझ्यापुढे मी कायम लहान आहे
सैनिक असून ज्याला युद्धात स्थान नव्हते
मुजरे करून आता झाला प्रधान आहे
घ्यावी पिऊन गंगा घोटात एकदाची
झाली जगात इतकी पापी तहान आहे
तुडवून सर्व गेले पडलो गळून जेव्हा
नशिबी सदा उपेक्षा मी तेच पान आहे
~ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !