Tuesday, June 1, 2021

माझा भाऊ पाठीराखा

⚜️ माझा भाऊ पाठीराखा

माझा भाऊ पाठीराखा
मज देतसे सावली
माया ममता भाऊच्या
अंतरात सामावली

तोच माय-बाप माझा
तोच मित्र, तोच गुरू
त्याच्या सोबतीने होतो
माझा दिनक्रम सुरू

स्वतः आहे अनवाणी
माझ्या पायी मलमल
त्याच्या पंखांच्या आधारे
उंच मारते मजल

जर ताटामध्ये माझ्या
कमी पडलेच काही
त्याच्या घशातून घास
खाली उतरत नाही

तोच सर्वकाही माझे
त्याच्याविना कुठे जाऊ
देवा प्रत्येक जन्मात
मला हवा हाच भाऊ

◾ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !