Saturday, May 14, 2022

खोपा

🌿 खोपा..

घडायचे ते घडून जाते
नसते काही हाती
करत रहा तू प्रवास पुढचा
जोडत नवीन नाती

अपुला-परका भेद कशाला
सारे कवेत घ्यावे
उरले-सुरले नकोच काही
ज्याचे त्याला द्यावे

सदा परीक्षा बघते नियती
सोंग नव्याने घेते
कुणी कफल्लक, कुणास अगदी
ओंजळ भरून देते

आहे त्यातच सुखी रहावे
नियम करावा सोपा
नको ईश्वरा महाल मोठा
दे छोटासा खोपा

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !