Friday, May 13, 2022

ओंजळ

🌺 ओंजळ..

कधी न कळले कशी अचानक
भुरळ मनाला पडते
ठरवतो एक करायचे पण..
दुसरे काही घडते

कसा सोडवू पेच असा मी
सर्व सावळा गोंधळ
तृप्त होणार इतक्यात पहा
पुन्हा रिकामी ओंजळ

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !