Friday, January 15, 2021

काट्यातही फुलायचे

सानी मिसरा सौ. आसावरी जाधव यांच्या एका गझलेचा

▪️▪️

काट्यातही फुलायचे
(जीवन असे जगायचे)

घर ठेवते अखंड जी
आई तिला म्हणायचे

डोळ्यात पाहिल्याविना
नाही खरे कळायचे

शिकली कुठे कसब प्रिये
स्वप्नी मला छळायचे

जगणे सये तुझ्याविना
नाही मला जमायचे

खोटे किती खरे किती
आहे अजुन ठरायचे

योद्ध्यापरी लढू सदा
इतक्यात ना हरायचे

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !