Wednesday, August 24, 2022

येईल बहर

~~ येईल बहर ~~

कुणा वाटते नवल
कुणा साधारण वाटे
जेव्हा जपाया फुलांना
प्रेम करतात काटे

लाख झाली इजा तरी
स्मित ठेऊ ओठांवर
दुःख नको गळतीचे
पुन्हा येईल बहर

↪️ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !