Tuesday, August 23, 2022

कळेनाच काही

~ कळेनाच काही ~

किती सोसावे दुःखाला
मज कळेनाच काही 
ठरवतो करायचे
तेच पूर्ण होत नाही

बळ संपत चालले
पार खचलो आतून
काय घडले असेल
असे चुकीचे हातून

↪️ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !