Thursday, April 13, 2017

मरण आईच्या कुशीत यावं

मरण आईच्या कुशीत च यावं

काळ होता खुप सुखाचा
सगळं सुरळीत चाललं होतं 
नवीन सदस्याची उणीव होती घरात 
म्हणुन आईने लग्न माझं लावलं होतं 

लग्न थाटामाटात पार पडलं 
आई जबाबदारीतुन मोकळी झाली 
आईचा मी काटेरी गुलाब होतो 
सांभाळाया मज गुलाबी पाकळी आली 

सुरवातीचे काही दिवस अंगणी 
हर्षाचे सडे पडू लागले 
पण जसं जसं जुनं झालं नातं 
आईशी खटके उडु लागले 

कधी आईला तिखट लागली भाजी 
कधी भातात मीठ नव्हतं 
जोरात भांडण पाहुन बायकोचं आईशी 
जाणवलं हिच्यापेक्षा धीट कोणीच नव्हतं 

बायकोचं वरवरचं प्रेम मला 
खुपचं घातक ठरत होतं 
बायकोच्या पारड्यात झुकणं माझं 
आईला जाचक वाटत होतं 

दोघींची पकड घट्ट 
माझी मात्र कात्री झाली होती 
आता काही खरं नाही 
मनोमन खात्री झाली होती 

शेवटी तो दिवस उजाडला 
व्हायला नको तेचं झालं 
धर्मपत्नीने माझ्या मला 
आईपासुन कायमच दुर केलं 

आता वेगळा होता संसार 
आयुष्याची वेगळी वाटणी होती 
प्रेमाची करुन कत्तल 
स्वप्नांची झाली छाटणी होती 

ज्या आईने मला भरभरून प्रेम दिलं 
तिचाच मी तळतळाट घेतला होता 
आईपासुन वेगळं करण्याचा घाट 
बायकोने फारंच अगोदर घातला होता 

आज सगळं आहे आयुष्यात 
आई मात्र जवळ नाही 
कशी माफी मागु आईची 

काहीच कळत नाही 

आता अपेक्षा काहीच नाही 
एक दान मात्र देवाने मला द्यावं 
जीवनापेक्षा चांगलं जे मरण आहे 
आईच्या कुशीत च यावं 

आईच्या कुशीत च यावं.........

कवी - सागर निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !